Author Topic: !! आप ! आप !आप --------  (Read 688 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
!! आप ! आप !आप --------
« on: January 03, 2014, 06:25:36 PM »
!! आप ! आप !आप --------
==========================
दिल्लीतील "आप"च्या केजरीवालच पाहून
कॉंग्रेसच्या निरुपमानाही शहाणपण सुचलं
म्हणे वीज कंपन्या लुटमार करताहेत
मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं

उपोषण करणे अन्नाचाच अधिकार नाही
तो माझाही आहे त्यांना आज कळलं
कॉंग्रेसच काही खर नाही हे कळल्यानं
मुख्यमंत्र्यांनीही त्यांना आश्वासन दिलं

तिकडे वसुंधरा राजेंनी सुरक्षा कमी केली
आता खऱ्या राजकारणाची सुरवात झाली
आतापर्यंत सगळे पक्ष झोपले होते
"आप " ने सगळ्यांची झोप उडवून टाकली

"आप " शिकवेल सगळ्यांना हे जनतेचे राज्य आहे
तुम्ही राजे नाहीत तर समाजसेवक आहेत
पुन्हा राज्य येण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली आहे
जनतेस पर्याय मिळालाय याची उपरती झाली आहे .
=================================
संजय एम निकुंभ , वसई दि. २.१.१४

Marathi Kavita : मराठी कविता