Author Topic: !! आयुष्य फार छान आहे !  (Read 1265 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! आयुष्य फार छान आहे !
« on: June 05, 2014, 10:09:02 AM »
!!  आयुष्य फार छान आहे  !!
.

( विशेष टिप :  वाचकांना एक विनंती आहे. सदर कविता हि त्यांनी शब्दश: वाचू नये.  मुळ अर्थ यातून समजून घ्यावा ..)
.
.
आयुष्य हे फार छान आहे
त्यात थोडी भूक तर थोडी तहान आहे
स्वत:च मन मारून दुसरयाला मोठ करण्याच
हे काम माञ खुप महान आहे
.
सदैव अपमान सहन करीत
आदराच्या शोधात ते बेभान आहे
आदर मिळाला क्वचित ठिकाणी त्यांना
जिथे न विकला कोणी ईमान आहे
.
पैसे कमवण्या च्या धावपळीत असतात
तिथे जिव मुक्त तर कधी गहाण आहे
फेडून ते ऋण ऊपकारांचे, 
स्वत:च्या नजरेत एक वेगळी शान आहे
.
त्या माझ्या आप्तांना माझा
काय भलताच चढला अभिमान आहे
कसे दिसणार हो त्यांना त्या बंद डोळ्यांनी
स्वाभिमानाच्या चितेवर जळणारे हे एक वेगळे स्मशान आहे
.
त्यांच्या मनात फुललेले ते माझे
निर्मळ चरिञाचे वेगळेच ते रान आहे
स्वत:च्या नजरेतच ऊतरून गेलेलो मी
ठाऊक नाही त्यांच्या साठी कसा मी महान आहे
.
हे आयुष्य हे फार छान आहे
ईथे बंद डोळे,  सोबत बंद कान ही आहे
कश्या कळणार हो यांना किंचोळ्या त्या माझ्या
कारण मला मृत्यूदंड देण्याचा यांनीच सोडलेला तो फरमान आहे ..
.
©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता