Author Topic: देवा गणराया माझी छोटीशी प्रार्थना...!!  (Read 642 times)

देवा गणराया माझी छोटीशी प्रार्थना...!!

माझ्यावर जशी वेळ आली,
तशी वेळ कुणावर येऊ नये.....

मला जे असंख्य दुःख मिळाले,
तसे दुःख कुणाला मिळू नये.....

मी ज्या यातना सोसल्या,
तशा यातना कुणीही सोसू नये.....

माझ्या बाबतीत जे घडले किँवा घडतयं,
तसं कुणाच्याच बाबतीत घडू नये.....

कारण ???

खुप वाईट वाटतय रे,
कुणी आपलं सोडून जाताना.....

मनाला आवरणं कठीण होतं,
डोळ्यातील अश्रूंला खोट्या हसण्यात लपवताना.....
:'(    :'(    :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २७-११-२०१३...
दुपारी १२,४६...
© सुरेश सोनावणे.....