Author Topic: ईथे नसे कुणीच कुणाच...!!  (Read 984 times)

ईथे नसे कुणीच कुणाच...!!
« on: December 05, 2013, 03:13:26 PM »
ईथे नसे कुणीच कुणाच,
जो तो बघतो स्वतःच.....

दुस-याच्या भावनेशी खेळून,
तोडतात नातं दोन जिवाच.....

जोडतात फसवं खोटं नातं,
खेळणं करतात नाजूक मनाच.....

नाही करत विचार कसालाच कधी,
फक्त ध्येय असतं स्वार्थीपणाच.....

खोटे खोटे रडगाणं गाऊन,
नाव बदनाम करतात पवित्र प्रेमाच.....

जाण नाही ठेवत कसलीच कधी,
नेहमी वाईट चिततात दुस-याच.....

खरं प्रेम करतो असे दाखवतात,
शेवटी प्रेमाला नाव देतात टाईमपासाच.....

कारण ???

हे जगच उरलयं फक्त,
आणि फक्त खोट्या नात्यांच.....
:'(    :'(    :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-१२-२०१३...
दुपारी ०१,०२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता