Author Topic: आयुष्यच माझं एक खेळणं आहे...!!  (Read 1327 times)

आयुष्यच माझं एक खेळणं आहे,
कुणाला काय फरक पडतो,
मी नसण्याचा.....

स्वतःचे दुःख मुखवट्यामागे लपवून,
प्रयत्न करतो,
खोटे खोटे हसण्याचा.....

मनातल्या मनात असाह्य वेदना सोसून,
प्रयत्न करतो,
मेहफिलीत चार चाँद लावण्याचा.....

एकांतात एक एकटा जगत आहे,
प्रयत्न करतो,
मरुनही जिवंत असण्याचा.....

देव ही रुसला माझ्यावर,
प्रयत्न करतो,
देवाचा शोध घेण्याचा.....

आयुष्याच्या शेवटी कळले मला,
देव ही असतो,
फक्त दक्षिणा देणा-याचा.....
:'(  :'(  :'(  :'(  :'( 

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २२-०२-२०१४...
सांयकाळी ०६,४३...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आयुष्यच माझं एक खेळणं आहे...!!
« Reply #1 on: February 24, 2014, 10:19:25 AM »
chan