Author Topic: कैसे जिवन दिले देवा...!!  (Read 911 times)

कैसे जिवन दिले देवा...!!
« on: April 07, 2014, 03:50:37 PM »
कैसे जिवन दिले देवा,
यातना सहन होत नाही,
जगावसं ही वाटत नाही,
मरण ही येत नाही.....

कैसे जिवन दिले देवा,
अस्थित्व माझे कुठे दिसत नाही,
आपल्यांची साथ नाही,
परख्यांकडून अपेक्षा नाही.....

कैसे जिवन दिले देवा,
अडखळत राहतो पावलोपावली,
धडपडतो स्वतःच्या सावलीसाठी,
आधार कुणाचा मिळत नाही.....

कैसे जिवन दिले देवा,
जगाची रीत कळत नाही,
प्रियतमेची आस नाही,
जिवलगांची सोबत नाही.....

कैसे जिवन दिले देवा,
स्वप्नांचा आभास नाही,
गाभा-याला उंबरठा नाही,
देवळात देवच नाही.....

कैसे जिवन दिले देवा,
विदूषक होऊन जगावं लागतय,
स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय,
का मी माणुस नाही ???
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०७/०४/२०१४...
दुपारी ०३:३९...
©सुरेश सोनावणे.....
« Last Edit: April 07, 2014, 06:29:05 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
Re: कैसे जिवन दिले देवा...!!
« Reply #1 on: April 08, 2014, 08:29:46 PM »
सुंदर लिहीलीय कविता....

RAAHUL

  • Guest
Re: कैसे जिवन दिले देवा...!!
« Reply #2 on: April 13, 2014, 01:08:48 PM »
SHABD CH APURE AHET....KHUP AAVADLI KAVITA..

khalate nitin

  • Guest
Re: कैसे जिवन दिले देवा...!!
« Reply #3 on: April 14, 2014, 03:01:28 PM »
aatishay sundar