Author Topic: असतात काही माणसं अशी...!!  (Read 1071 times)

असतात काही माणसं अशी...!!
« on: April 10, 2014, 10:28:10 PM »
असतात काही माणसं अशी...!!

असतात काही माणसं अशी,
मतलबीपणा दाखवणारी,
तोँडावर गोड बोलून,
पाठीमागे तोँडसुख घेणारी.....

असतात काही माणसं अशी,
स्वार्थीपणा साधणारी,
त्यांच काम झालं की,
सरड्यागत रंग बदलणारी.....

असतात काही माणसं अशी,
आपुलकीचा दिखावा करणारी,
ख-यापणाचा आव आणुन,
परख्यागत सोडून जाणारी.....

असतात काही माणसं अशी,
माणुसकीला काळीमा फासणारी,
गरज असताना साथ सोडून,
संकटाला घाबरुन पळणारी.....

असतात काही माणसं अशी,
वचने देऊन ती मोडणारी,
वेळेनुसार उपयोग करुन,
गरज असेपर्यन्त वापरणारी.....
 
असतात काही माणसं अशी,
खोटी नाती जोडणारी,
मनात हक्काच स्थान मिळवून,
विश्वासघात करणारी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १०/०४/२०१४...
रात्री १०:१८...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: असतात काही माणसं अशी...!!
« Reply #1 on: April 12, 2014, 02:35:29 PM »
छान ,
असतात काही माणस अशी ....?