Author Topic: आयुष्य असेच संपतयं...!!  (Read 1140 times)

आयुष्य असेच संपतयं...!!
« on: April 23, 2014, 03:50:38 PM »
आयुष्य असेच संपतयं...!!

कधी काही घडतयं,
कधी कुठे बिघडतयं,
भावनांच्या भरात,
मन धाय मोकलून रडतयं.....

कधी काही अडतयं,
कधी कुठे चुकतयं,
दुःखाच्या दरीत राहून,
सुखाचा शोध घेतयं.....

कधी काही जमतयं,
कधी कुठे सुटतयं,
शब्दांच्या सानिध्यात,
विचारांच पाखरु उडतयं.....

कधी काही बोचतयं,
कधी कुठे सोसतयं,
रक्ताच्या थारोळ्यात,
वेदनांच अंकूर फूटतयं.....

कधी काही हसतयं,
कधी कुठे रुसतयं,
स्वप्नांनी सजलेलं आभाळ,
शापित ता-यागत तुटतयं.....

कधी काही ऐकवतयं,
कधी कुठे दिसतयं,
अंधाराच्या सावलीत,
काळीज धडधडतयं.....

कधी काही वेडावतयं,
कधी कुठे खुपतयं,
नात्यांच्या मायाजाळात,
आयुष्य असेच संपतयं.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २३/०४/२०१४...
दुपारी ०३:२३...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: आयुष्य असेच संपतयं...!!
« Reply #1 on: April 27, 2014, 12:51:31 PM »
खरे आहे !!!
तरीही ....आयुष्य घडतंय ...आयुष्य घडतंय ........