पावसाची सर जमिनीवर अलगद उतरली
आणि नकळत मला भूतकाळात घेऊन गेली...
वाफळ्लेला चहा घेत मी खिडकीत उभी होते,
भूत आणि वर्तमानाची वृथा तुलना करत होते...
वाऱ्याच्या झुळुकिसोबत मातीचा सुगंध नाकात शिरला,
मलाच कळेना नव्या वह्यापुस्तकांचा वास आता कुठे हरवला?
गरमागरम भजी आता हवी तेव्हा खाणार
पण; भाभीची बोर कधी बर चखणार?
लेक्चर तर काय आता कोण पण देणार
पण;'गाढवांनो, ताटात खाता की पाटित खाता 'अस कोण सुनावणार....
ती मधली सुट्टी....तो डबा....आता सगळ संपल,
कैंटीनच खान रोजचच,घरच जेवण केव्हाच सुटल...
particular व्यक्तीच्या नकळत त्याच्यावर चोराती नजर टाकन,
वरुन उगाच 'सज्जनतेचा' वाव आनन...
हे सगळ शालेबरोबरच संपल,
निरागस्तेच नि आमच नातच जणू तूटल...
कॉलेज आता मर मरून काम करून घेतय,
आमच्यातला proffesinalist घडवतोय
पण; मूल्याचे धडे इथे कोण देणार?
नोटा कश्या छापायच्या एवढच इथे कळणार...
आजपर्यंतच्या प्रवासात कधी धावलो तर कधी अड़खळलो,
पण;तुम्ही दिलेल्या शिदोरीवरच इथपर्यंत पोहोचलो.
येणारी प्रत्येक सकाळ नवीन दिशा दाखवतेय,
नव क्षितिज दर्शवतेय...नवी साद घालतेय....
तिथपर्यन्त पोहचु की नाही,माहित नाही
पण पाठिशी तुमचे आशिर्वाद असतील,यात शंकाच नाही...
- मिताली संचेती
स्वप्निल गायकवाड