Author Topic: बेरंग झालेल्या आयुष्यात...!!  (Read 605 times)

बेरंग झालेल्या आयुष्यात...!!

बेरंग झालेल्या आयुष्यात,

थोडे रंग भरावे म्हणतो.....

मी माझ्या एकांताला,

थोडे एकटे सोडावे म्हणतो.....

विसरुनी जरासे दुःखाला,

थोडे सुख भोगावे म्हणतो.....

थांबवूनी जाणा-या वेळेला,

थोडे निवांत बसावे म्हणतो.....

हरपून देहभान पुर्णता,

नव्याने आयुष्य जगावे म्हणतो.....
.♥.  :-D  .♥.  :-D  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २०/०२/२०१५...
सांयकाळी ०८:०६...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


amit vaidya

  • Guest
Re: बेरंग झालेल्या आयुष्यात...!!
« Reply #1 on: February 24, 2015, 12:35:16 PM »
 :) Khup chan kavita ahe.....