हाच ना तो रुमाल!!
ज्याची करायचीस इवलीशी घडी,
आणि मी उशिरा आलो कि मारायाचीस मला,
थोड्याश्या लटक्या रागाने पण याचीच करून छडी.
हाच ना तो रुमाल!!
वाट बघताना माझी गुंडाळायचीस बोटी,
चावायचीस दाताखाली आणि धरायचीस ओठी,
मुठीमध्ये दाबून सारखा करायचीस चुरगळी,
आणि यातच ठेवायचीस मी आणलेली फुलकळी.
हाच ना तो रुमाल!!
त्या दिवशी मी जाताना दूर,तुझा दाटला होता उर,
कमाल आहे याचीपण,
कसे काय साठवले स्वता:त सारे तुझ्या डोळ्यातले पूर.
हाच ना तो रुमाल!! ................. अमोल