तू माझा मित्र, नव्हे; "जिवलग" मित्र
मित्र-मित्र म्हणवणारे बरेच आहेत
पण तू माझा सर्वांत "अलग" मित्र
मित्र कसा असावा? तुझ्यासारखा
पारखल आजवर कित्येक जणांना
पण माझ्यासाठी तूच एक लाडका
मित्र म्हणजे काय? शब्दांत काय सांगू?
शब्दांच्या व्याख्येत तुला कसा बसवणार?
मित्र म्हणजे- इतर कुणी नाही- फक्त तू!!