सर्व संपले असे जाणवत असतांना
पुन्हा एक सूर्य उगवतो
खुणावतो अन म्हणतो पुन्हा प्रयत्न कर
कुठेतरी एखादी खिड़की मिएल
अन तेथून मिल्नारा हर एक स्वाश
माग तुला म्हणेल " सर्व काही ठीक आहे"
या विश्वासावर पुन्हा सुरु होते दिवसाची पाळी
आकाशाच्या सुर्याची पुन्हा एकदा बेट लावायची घाई की
तू आसे पर्यंत मी शोधून काढणार माझ्या प्रश्नाची उत्तर !!
संध्याकालच्या सुर्याचा तो स्व्चा केशरी रंग मग म्हणतो मला
"जरा थकला असशील ये मज्ह्या पाशी थोडा शांत बईस"
पण मी म्हणतो " तू नको जाऊस मी जिंकणार अन तू हरणार आहेस "
अन थकलेल्या मनाचा सूर्यास्त होताच
पुन्हा वाटते " संपले सर्व काही अन रात्र ही शेवटची"
दोगारापलिकडून तो हळूच हसतो अन उगवत म्हणतो
" मी आहे ना , पुन्हा प्रयत्न कर " !!
--अस्मिता