Author Topic: जागतिक महीला दिनाच्या मनसे शुभेच्छा!!  (Read 673 times)

Offline Tinkutinkle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 58
जागतिक महीला दिनाच्या मनसे शुभेच्छा!!
 .

ती अशी उंचावता
नभ जरासे वाकले
पसरली ज्योत्स्ना तिची
अन् चंद्र तारे झाकले
.
गवसणी झाली आभा
ते तेज इतके फाकले
स्वर्णिमा तो स्पर्शण्याला
कर रवीने टाकले
.
झेपली उत्तुंग जरी ती
पाय दारी राखले
कवळीले ब्रह्मांड तिने
हो, मागू नका दाखले !!
 
-मीरा सिरसमकर
« Last Edit: March 08, 2012, 03:46:59 PM by Tinkutinkle »