Author Topic: माझी आई ..!!  (Read 1498 times)

माझी आई ..!!
« on: May 09, 2012, 02:49:35 PM »
माझी आई ..!!
जगात येताना त्रास देऊन येतो आपण
झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते ती आई

फुलपाखराला  उडायला शिकवते ती आई
उपाशी राहून प्रेमाचा घास भरवते   ती आई

बाळ झोपत   नाही म्हणून अंगाई गात जागते ती आई
आपल्या जखमा  पाहून डोळ्यांत पाणी आणते ती आई

माझी आई खूप चांगली आहे खरच
भाग्यवान आहे मी मला दिलीस आई
पण....
दूर आहे  मी मला खूप ती आठवते
तिचे नाव घेताच डोळ्यांत पाणी खूप साठवते

वेळ ही कशी असते  जिला मान्य नसते  नाते
दुख खूप आहेत  नेहमी ते मलाच  एकट्यात पाडते

आई तुझी आठवण मला जागवत असते
माहित नाही ग  तुला मी भेटेल पुन्हा कि नाही
पण....
अखेरचा श्वासात ही  फक्त तुझेच नाम राहील ....
-
© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता