Author Topic: जसे दिवस येतात तसे ऋतू बदलतात !!  (Read 744 times)

जसे  दिवस जातात  तसे  ऋतू बदलतात

पावसाच्या  सरीने  मने ही भिजून जातात
गारवा येतो  काही क्षण
अन....
दुख  गोठवून जातो
उन्हाचे चटके ते काळजाला ह्या    होतात
अन ...?
उन्हाने  त्या  कुणाचे  डोळे भरून येतात

तरसवतो  तो पाऊस अन  सतावतो  तो उन्हाळा
घामाने  उगवलेल्या   मळ्याला
विस्कटून  नेतो  एक  वादळ

जसे दिवस येतात  तसे ऋतू बदलतात
हसणाऱ्या    ह्या  चेहऱ्यावर  दु:खच  देऊन जातात ..
-

© प्रशांत शिंदे
 
« Last Edit: August 03, 2012, 10:28:30 AM by प्रशांत दादाराव शिंदे »