
!.....राखी.....!

नव्हते कुणी मित्र, दोस्त तू तेव्हा माझी सखी...
मनगटावरी वाट पाहते तुझी रेशीमधागी राखी...
दिन तो भासे जणू सोहळा, आपुल्या प्रेमाची झांकी...
सरले क्षण अन विरली नाती, आता न काही बाकी...
येता आठव पिळते मन, होते वर्मी आणि दुखी...
आसवांनी ओलावून जाते तू न बांधलेली राखी...
........महेंद्र
