ॐ साईं.
हे आयुष्या फक्त, एकदा माझ्या घरी येशील..! चारुदत्त अघोर.(३/४/११)
इतके जिव जन्मास घालतो,आहे का त्याचा हिशोब,
खरंच का कोणावर,असतो तुझा लोभ;
कधीतरी क्षणभर,विचार करून घेशील;
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
तू दिलेल्या स्वतःस,हर जन जपतो,
प्रत्येक येता क्षण,तो आजीवन तपतो;
त्याच्या जप-तपाची,चाचणी करून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
तुझ्या लांबी वर जीवमात्र,दिवस मोजतो,
उन्हाळी गरमावतो,पावसाळी भिजतो;
थंडीतही त्याच्या, गारठण्याची तसदी घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
येण्याची चाहूल कळेल,जेंव्हा आवाजेल तुझी धाप,
जरुरी नाही माझ्या दारावर, तू द्यावी कोणती थाप;
सरळ चालणारा तू ,कधी जिना हि चढून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
नाही घातल्या पायघड्या तरी,धुवीन नक्की पाय,
काय माझी माया सांगू,जशी दुधावरची साय;
मनावर घेऊन कधी,विचार करून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
तू जर आलास तर, माझीच वाढेल धडधड,
अपुर्या शब्द-तोंडी,शांत होईल बडबड;
पोट भरल्या तू,हातून माझ्या तोंड, गोड करून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
विचारीन तुझं स्थैर्य,कुशल-मंगल-क्षेम,
काही नाही तरी देईन, अडीच अक्षर प्रेम;
दिलेला याच्या ओल्याव्यानी,थोडं नाहून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
नाही माहित तू कधी जागतो व कधी झोपतो,
कोणत्या प्रसंगी आनंदतो,व कधी कोपतो,
असंख्य भावनांनी थकल्या तू,हृदयी माझ्या विसावून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
बघ तर खरी या धरणी वरचे, बदलते ऋतू,
कसं आहे दुःख व कसा आनंद,जातो उतू;
चाकोरी बध्धी कधी,माझ्या ऋतूत हि बहरून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
नाही माहित येणं तुझं,कठीण कि आहे सोप्पं,
माझंच चालतं जीवन, झालं रे आहे ठप्प;
कंटाळल्या मला,तुझ्या पाऊली चालवून घेशील,
हे आयुष्या फक्त,एकदा माझ्या घरी येशील..!
चारुदत्त अघोर.(३/४/११)