Author Topic: सांग ना गं आई!  (Read 894 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
सांग ना गं आई!
« on: April 11, 2013, 11:55:35 AM »
कधी कधी लहान मुलं असा एखादा निरागस प्रश्न विचारतात की आपलं सगळं शहाणपण अर्थ शून्य असल्याचं वाटतं. अश्याच ऐका प्रसंगातून मला जाणवलेलं सगळ्यातलं फोलपण.
 
मुलीनी विचारलं…………………
पाणी जपून  का  गं वापरायचं आई?
मी सांगितलं…………………
महाराष्ट्रात दुष्काळ आहे गं बाई!

मुलीनी विचारलं…………………
दुष्काळ म्हणजे काय गं आई?
मी सांगितलं…………………
पाण्याचं दुर्भिक्ष गं बाई!

मुलीनी विचारलं…………………
दुष्काळ का गं पडला आई?
मी सांगितलं…………………
पाऊसच पडला नाही गं बाई!

मुलीनी विचारलं…………………
धरणाचं पाणी का गं सोडत नाहीत आई?
मी सांगितलं…………………
नियोजनच नीट नाही गं बाई!

मुलीनी विचारलं…………………
नळाचं पाणी का गं वापरत नाहीत आई? 
मी सांगितलं…………………
लोकांच्या नळाला पाणीच नाही गं बाई!

मुलीनी विचारलं…………………
आपल्या कडे कसं पाणी आहे गं आई?
मी सांगितलं…………………
हि मुंबई आहे गं बाई!

मुलीनी विचारलं…………………
लोकं पाणी का गं वाचवत नाहीत आई?
मी सांगितलं…………………
सामाजीक स्थितीचं भानच नाही गं बाई!

मुलगी गप्प बसली……………  
मी ही जरा निवांत झाले………………  
दुष्काळ, नियोजन, सामाजिक भान
मुलीला कळलं म्हणून सुखावले

मुलीनी विचारलं…………………
मी जपून वापराल्यानी, पाणी
दुष्काळी भागाला कसं मिळेल गं आई?
माझ्या कडे उत्तर  नाही……….

मुलीनी विचारलं…………………
जपून वापरायला सांगण्या पेक्षा, सरकारच
पाणी कमी का गं सोडत नाही आई?
माझ्या कडे उत्तर  नाही……….


केदार…   
 

Marathi Kavita : मराठी कविता