Author Topic: पोटासाठी ! विकते मला ………… संजय निकुंभ  (Read 644 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
पोटासाठी ! विकते मला ………… संजय निकुंभ
------------------------------
हो ! करते मी धंधा
माझ्या शरीराचा
पोटासाठी
जगाची पर्वा न करता
विकते माझी योनी
त्या क्षणापुरता
गिऱ्हाइकाच्या ऐपतीप्रमाणे
कधी कमी कधी जास्त भावात
अन चालवते संसाराचा गाडा .

कधी कधी माझी योनीही
माझ्यावर चिडते
तिच्यावर अन्याय होतोय
असही ओरडते
मग तिला सांगाव लागतं
किती आहे तुझं आयुष्य
तू तरी जाणतेस कां
बाई चाळीसीच्या पुढे गेल्यावर
तुझी किंमत काय उरणार हाय .

पुरुष सत्तरीचा झाला तरी
पैका असल्यानं
कोवळी योनी विकत घेतो
अन रोजच्या रोज
हजारो कोवळ्या योन्या
आणल्या जातात या बाजारात
त्याला हवा तसा तो वापरतो
तेव्हा ती योनीही
निशब्द असते पैशाच्या गरजेपोटी .

कधी कधी विचारतो समाज
दुसरं कुठलं काम कां नाही करत म्हणून
मग मी उत्तर देते
हे काम समाजानचं तर शिकवलं
कधी नवऱ्यान तर कधी बापानं
या कामावर पाठवलं
जेव्हा कुठली बाई
चारीत्र्याचे गोडवे गाते
तेव्हा मी फक्त हसते
कारण तिचाच कुणीतरी
रोज माझ्या योनीची
भिक मागतो माझ्याकडे
पांढर पेशातील मानसं
रोज असतात माझ्या शय्येवर
मग मीच कशी वाईट ?
अन हा धंदा जर वाईट वाटतो समाजास
तर अनादी काळापासून कां चालतोय
तो का बंद नाही करू शकत कुणी ?
चांगल ओळखलंय मी
या समाजाच्या चेहऱ्याला
म्हणून कुणीच नावं ठेऊ शकत नाही
माझ्या या धंद्याला .
----------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. २० . ७ . १३ वेळ : ११ .०० स.