Author Topic: गंध मातीचा….!  (Read 751 times)

Offline दिगंबर कोटकर

  • Newbie
  • *
  • Posts: 31
  • Gender: Male
  • Digamber A Kotkar
    • marathi.majhya kavita
गंध मातीचा….!
« on: September 03, 2013, 10:19:32 AM »


फुलांच्या गंधकोशी,
मकरंद निवसतो,
धरेच्या अधरी का रे ?
तप्त लाव्हा उसळतो…।        १

चांदण्यांच्या गावी लख्ख,
चांदोबा लकाकतो,
प्रेमाच्या गावी का गं ?
विरह विलासतो…।              २

चंद्रमाच्या अंगी गार,
शीतलता विराजते,
सूर्याच्या अंतरी का रे ?
हलोजन विस्फोटतो …।        ३

पाखरांच्या अंगी छान,
सप्तरंग हे शोभते,
प्रेयसीच्या नयनी का गं ?
अश्रुधारा ह्या वाहती…।         ४

अतिनील किरणांस रोखण्या,
ओझोन वायू कामा येतो,
रतिच्या प्रीतीत का रे ?
मदन हा रडतो………            ५   

पाऊसात लतिका भिजते,
वसुन्धरेस साज चढतो,
पाण्यात भिजुनी का गं ?
गंध मातीचा ह्या येतो…….      ६

ओलीचिंब वेलं जेव्हा,
झाडाला चिपकते,
मातीच्या दर्पाची का रे ?
तेव्हा लहर उसळते…….          ७

वेलीस आधार त्या,
वृक्षांचाच आहे,
पाण्यास हि का गं ?
चव मातीचीच आहे…।             ८

दर्प हा सुगंधी,
मना लाविला गं छंद,
काय नाव देऊ त्यास,
जग म्हणे मृदुगंध…                ९ 


               @@@@ दिगंबर @@@@
                 8855077412

Marathi Kavita : मराठी कविता