Author Topic: रिचवा दारू ! पचवा दारू  (Read 901 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
रिचवा दारू ! पचवा दारू
« on: December 30, 2013, 10:57:54 PM »
रिचवा दारू ! पचवा दारू
===============
रेल्वे म्हणते तुमच्यासाठी
आम्ही जादा फेऱ्या मारू
नको काळजी तुम्हां रात्रीची
८ फेऱ्या जास्त मारू
फक्त तुम्ही एवढचं करा
रिचवा दारू ! पचवा दारू

पवार म्हणती लोकांना अजून
वाईनची सवय जडली नाही
घरा घरांत वाईन हवी
त्यांचे स्वप्न पूर्ण करू
फक्त तुम्ही एवढचं करा
रिचवा दारू ! पचवा दारू

सरकारनेही केलीय जय्यत तयारी
वेळ वाढवलीय बारची भारी
या संधीचा फायदा घ्या हो
आपण सरकारचे गल्ले भरू
फक्त तुम्ही एवढचं करा
रिचवा दारू ! पचवा दारू

काय जमाना आलाय बघा हा
जीवास प्यारी झालीय दारू
किती संसार उघडे पडतात
जो मरतोय त्याला द्या मरू
तुम्ही फक्त आनंद लुटा रे
रिचवा दारू ! पचवा दारू

पुरुषांसाठी आहे व्हिस्की
स्रियांना बियरचे ग्लास भरू
सिगारेटचे धुराडे सोडून
गम्मत जम्मत भारी करू
दोघांनाही समान हक्क
रिचवा दारू ! पचवा दारू
====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३०.१२.१३ वेळ : १०.३५ रा.   

Marathi Kavita : मराठी कविता