Author Topic: माझी कविता..!  (Read 591 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
माझी कविता..!
« on: April 29, 2014, 11:43:23 AM »
ह्रदयाच्या प्रवासात मला त्यांची ओळख झाली,
बंधनात गुंतुन त्यांच्या, कविता माझी उदयास आली।।

भावनेच्या नादापायी व्याक्रनाची कोंडी झाली,
आयुष्याची दॆना मांडताना शब्दांचीच साथ मिळाली।।

शब्दाच्या त्या रुपाच्या मोहापायी, माझी लेखणीही लाजली,
हाती पडलेल्या कागदातुन, ज्योत अन्यायाची मावळली।।

अपमानाची मज होती जानीव, त्याला जोड होती अद्ण्यानाची,
झालो बंधनातुन मुक्त, मला साथ होती माता-पित्याची।।

वाचताना भविष्याचं पान, घात केला काजळीने,
अंधारातुन जाताना वाट दाखवली दिव्याने।।

प्रकाशाच्या त्या तेजाने, अंग भरले हर्षाने,
आठवुन तो जुना माळाराण, डोळे भिजले पाण्याने।।

↝↝S. More↜↜

Marathi Kavita : मराठी कविता