Author Topic: तु मिळावीस म्हणून..!  (Read 1008 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
तु मिळावीस म्हणून..!
« on: February 22, 2015, 09:29:47 PM »
तु मिळावीस म्हणून
शाळेत असल्या पासून ते आजपर्यत
शिकतोय खुप काही
अनेक जाड जाड बुक घातलीत डोळ्याखालून
नजर मात्र तुझ्यावरच असायची कायमची
तुझ्यावर इंम्प्रेशन पडेल म्हणून अनेक डिग्रीचे कागदही जमवलेत
तु भेटशील कुठेतरी म्हणून अनेक ठिकाणं ही धुंडाळली;
पण तु मारायची हूल नेहमीप्रमाणे
आता त्यात तुझा तो दोष तो काय?
माझ्याप्रमाणे अनेक जणही करतात तुझ्यावर प्रेम जीवापाड
आणि त्यामुळेच तु भेटू शकली नाही मला आजपर्यंत
पण म्हणून मी निराश न होता शोधत असतो तु भेटण्याची ठिकाणे
हल्ली तु खूपच फेमस झालीये हे माहीतीये मला म्हणून पेपरातही नजर असते नेहमी
आता तुझ्याशिवाय दुसरा उद्योगच नाही मला
म्हणून लोक प्रेमाने म्हणतात बेरोजगार मला
पण त्यांना कुठे माहीत तु भेटल्यावर माझे सर्वच प्रश्न मिटतील चुटकीसरशी
फक्त तुझ्या वाटेकडे डोळे लागलेत माझे
त्यामुळेच कि काय? हल्ली लग्नाचे वय होऊन ही कुणी विचारतही नाही लग्न
करतोय का म्हणून
वडील मात्र संतापून म्हणतात कधी कधी "अरे भाऊ दे सोडून तो नाद नोकरीचा!
आपल्या लोकाला कसली नोकरी अनं कसलं कायं!"

--राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


ज्योती

  • Guest
Re: तु मिळावीस म्हणून..!
« Reply #1 on: March 02, 2015, 12:08:11 PM »
वडील मात्र संतापून म्हणतात कधी कधी "अरे भाऊ दे सोडून तो नाद नोकरीचा!
आपल्या लोकाला कसली नोकरी अनं कसलं कायं!"

वडील म्हणतात तेच बरोबर
शेळ्या हाकण्यासारखा धंदा चांगला
जगात दुसरा काही नाही