Author Topic: मी शब्दात व्यक्त होत नाही !  (Read 652 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
तुला अस वाटत ., मी व्यक्त होत नाही ….!
पण कस सांगू तुला ., कधी कधी .,
मी शब्दात व्यक्त होत नाही !

एकदा नजर भिडव अशी , क्षणात तीही बोलू लागते .,
आवरलेल्या भावनेला मग माझ्या ., पळवाट ती शोधते .,
तरीही….  सांगावी तशी आपली , नजरच भिडत नाही ,
अन कस सांगू तुला ., प्रत्येकवेळी मी शब्दात व्यक्त होत नाही !

एकदा स्पर्श करून बघ , मग तुझ्या नसा ही थिरकावू लागतील .,
मला अचंभित केलेले प्रश्न कदाचित ., तुलाही पडतील,
तरीही … घट्ट मिठीत सुद्धा , आपले ऋणानुबंध जुळत नाही ,
अन आजही मी माझी भावना ., शब्दात व्यक्त करू शकत नाही !

सहजच नजर फिरवून बघ ., त्या कवितेत माझ्या .,
कदाचित भेटेल तुला प्रश्नाचे उत्तर ., तुझ्या ।
हरवशील तुही या विचारांत माझिया …. पण
ते आचरणात आणणार नाही .,
कारण तू हि तीच भावना शब्दात व्यक्त करू शकणार नाही
शब्दात व्यक्त करू शकणार नाही ….!


अक्षय भळगट
२७.०२.२०१५