Author Topic: पुन्हा तेच ते !  (Read 503 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पुन्हा तेच ते !
« on: June 10, 2015, 03:53:07 PM »
पुन्हा तेच ते !

का हल्ली शाळेतल्या
मुलां सारख होतं?
कामाला जावुच नये
सारख अस वाटतं !

स्कुल बसची धमाल
वेगळीच होती तेंव्हा,
नसते आजकाल जागा
ट्रेनमध्ये पाहिजे तेंव्हा !

तीच तीच शाळा
बाक सुुध्दा तेच होते,
तसच आहे आँफीसचं
फाईल्सचे ढीग तेच ते !

दहावर्षे तेच शिक्षक,
जुळले बंध त्यांच्याशी,
इथे मात्र नित्य बदल
केव्हातरी भेट साहेबांशी !

थकायचा जीव शेवटास
नित्य त्या अभ्यासाला,
जी बाब होती शाळेत
तोच अनुभव कामाला !

शिकलो शाळा तेंव्हा
म्हणुन इथवर पोहचलो,
कराया संसार जगरहाटी
म्हणुन नोकरीस लागलो !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता