मन !
नि: स्तब्ध शांतता
एक अगतिक जाणिव
घुसमटलेला श्वास आणि थिजलेली मन !
सुरुवात एका क्षणाची की,
मृत्यू एका निमिषाचा
याच कोलाहलात गोंधळलेली मन !
बधीरलेली इंद्रिय
गोठत जाणारा क्षण
तरीही सार्यात 'जगण्यासाठी' अधिरलेली मन!
सभोवताली 'भटियार'
पण आत 'मारवा' अन
गडद होवून सांजावलेली गहीवरणारी मन!