किती सहज बदलतो आपण !
किती सहज बदलतो आपण !
जसे चंद्रकलेने बदलावे
नको असलेल्या भावनाही
जपत फिरत असतो आपण
आपल्याच आठवनिंच्या गाठोडयात घेउन ..........
किती सहज बदलतो आपण !
सांज बदलते कातरवेळेत
जशी नीरव अंधारात,निजलेली रात्र
रातकिड्यांची किर्रर्र सहन करत असते
किती सहज बदलतो आपण !
जसे सत्याने पश्यतापात बदलावे
तेच सत्य आपले अस्तित्व घेउन,
आपल्याच समोर निशिंत उभे असते
खरच किती सहज बदलतो आपण !
जेव्हा बदलत असतो आपल्यातला मी........
सुनिल (रूद्र )..................
rudrakambli@gmail.com