Author Topic: माझी पहिली कविता..!  (Read 1106 times)

Offline vijay_dilwale

 • Newbie
 • *
 • Posts: 27
माझी पहिली कविता..!
« on: November 09, 2010, 04:30:19 PM »
खूप दिवसापास्न चाल्लय डोक्यात...
कविता करू असं आलय मनात..
पण कशावर करू..काय लिहू..
काही सुचेनास झालय..!!

 
समोर आई बसलीये..
तिच्यावर २ ओळी लिहू म्हणून आलं मनात..
पण मग बाबांना राग नाही येणार..?
सारखं सारखं आई लाच का म्हणून देवपण देऊ..
बाबांनी काय कमी सोसलंय माझ्यासाठी?
छे यार काहीच कळेनास झालंय..!!

 
आज काल मित्रांची पण खूप आठवण येतेय..
त्यांच्यासोबत घालवलेला एकूण एक क्षण आठवतोय..
पण त्या क्षणांची मजा कवितेत सामावणार आहे थोडीच..?
ती एका पार्टी ची रंगत परत मिळणारे का हो मुळीच..?
आणि कविता वाचल्यावर त्यांच्या शिव्या पडणार त्या तर वेगळ्याच..!
काय लिहू आता...डोकं बंद पडलंय..!!

 
कधी कधी वाटत..काही तरी मोठं लिहाव..
आयुष्य वगैरे कल्पना आपणही मांडून बघावं..
देवालाही जरा आपल्या परीक्षेत नापास करावं..
पण मी म्हणालो म्हणून असं होणारे का खरंच?
आणी झालंच जरी..तर कोण बसणारे बघत..आहे का तेवढा वेळ कुणाला..
कोणासाठी कविता करू मग मी..?

 
होतं कुणीतरी हक्काचं माझ्या...जिच्यासाठी कविता केली असती मी..
आणी कदाचित वाचायची हिम्मत हि झाली असती तिच्यासमोर..
पण ती असताना जमलच नाही कधी...
आणी आज ती जरी नसली आयुष्यात तरी तिची आठवण मात्र पाठ सोडत नाही..
डोळ्यात पाणी दाटत...अश्रू सुसाट वाहतात...पण शब्द मात्र फुटत नाहीत..
का कोण जाणे...कविता मात्र होतंच नाही..!!

 
खरंच..पटलय आता मनाला...
कविता काही खाऊची पेंड नाही..
ठरवून काही कविता होत नाही..
आणी सुचायला आमचे मेंदू तेवढे "काल्पनिक" नाहीत..
जाऊ दे आता...
कविता परत करायची नाही..!!!


- विजय दिलवाले.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Rahul Kumbhar

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,542
 • Gender: Male
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #1 on: November 09, 2010, 07:31:28 PM »
waah..mast jamliye..pahili kavita...

Offline vijay_dilwale

 • Newbie
 • *
 • Posts: 27
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #2 on: November 12, 2010, 05:12:38 PM »
thx...  :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #3 on: November 13, 2010, 01:20:53 PM »
hey
mast aahe tuzi pahili kavita
avadali.

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #4 on: November 13, 2010, 01:42:10 PM »
kya baat hai mast!!

Offline nikhilsamre

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #5 on: November 15, 2010, 10:43:36 PM »
mast re..  :) ;D

Offline vijay_dilwale

 • Newbie
 • *
 • Posts: 27
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #6 on: December 05, 2010, 12:06:08 AM »
thx

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #7 on: December 10, 2010, 11:14:01 AM »
good try keep it up bro......................

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: माझी पहिली कविता..!
« Reply #8 on: April 03, 2011, 12:22:53 PM »
prembhang zala ki kavita apoaapach suchatat re :P ......... chhan ahe kavita ........ keep writing and keep posting ......... :)