ज्याची चातक आतुरतेने
वाट पाहत होता,
तो आज येणारेय,
आसुसलेल्या धरणीला
खुप-खुप काही देणारेय,
मोर तयारीनं उभायं,
झाडं आपली हिरवी पानं
सरसावून बसलिएत,
पक्षी आपले पंख सावरून बसलेत,
मातीतल्या बीजाला अंकुरायची ओढ लागलीय,
नदी नाल्यांना ओसंडून वाहायचयं,
वाऱ्याला गारवा देत
सुसाट धावायचयं,
आभाळाची काळी छाया पाहुन
शेतकरी आनंदून गेलायं,
सगळ्यांना अगदी चिंब भिजायचयं,
असं वाटतयं
तो क्षण आलाय,
पण हे काय?
अचानक सारं आकाश व्यापणारे काळे ढग
क्षणात हवेत विरून गेले,
जशी मानव आजपर्यँत
निसर्गाला देत आलाय,
तशीच निसर्गाने मानवाला
दिलेली ही हुलकावणी!!
-ट्विँकल