तळपता शिवसूर्य तू
जिजाऊसम
स्वर्णिमेचा पूत्र तू,
या जगात राजा
एकमेवाद्वितीय तू,
प्रत्येकाच्या मनाचा अढळ
सिँहासनाधिश्वर तू,
आजदिनी राजराजेश्वर
छत्रपती जाहले,
आनंद गगनी मावेना,
हे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर शिवछत्रपती राजा
तुला आमचा
कोटी कोटी मुजरा !!
कोटी कोटी मुजरा !!
-ट्विँकल देशपांडे.