Author Topic: मी माझा मैत्रेय!  (Read 903 times)

Offline अमोल कांबळे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 101
  • Gender: Male
  • मी माझा मैत्रेय!
    • मी माझा मैत्रेय!
मी माझा मैत्रेय!
« on: July 31, 2011, 08:52:53 PM »
मी माझ्या मनाचा,
निखळ अंत रंगाचा ,
स्वप्नातल्या वाहत्या नदीचा,
शांत शांत किनारा,
मी अबोल, अन छंद लेखणीचा,
दौतीच्या निळ्याशार शाईचा उभरता पिसारा,
मी आपल्याच विश्वाचा
जुन्या आठवणींचा मायेचा उमाळा,
मी वेड्या मनातला
बेभान पावसाच्या गारा वेचणारा,
मी शब्द तुमचे, मनातले मनापासून जपणारा,
माझा मी अमोल क्षणांचा थेंब थेंब जगणारा,
मी मित्र , मित्राचा जिवलग जीवाचा अलबेला मी माझा मैत्रेय!

मैत्रेय (अमोल कांबळे)

मराठी कविता ह्या पेज वरील सर्व मित्रांना मित्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या!

Marathi Kavita : मराठी कविता