Author Topic: खरं आहे मी आता हसायला लागलोय ..!  (Read 786 times)

खरं आहे मी आता हसायला लागलोय ..!

पण   मी विचारांत गुंतून बसलोय
ठाऊक नाही  कोणते प्रश्न आहेत
आधार हि वाटतो अन  दुरावा ही
ठाऊक नाही असे का मन झुरायला लागलंय 

खरंच आहे मी हसायला लागलोय ... !

हा तर मुखवटा आहे  हे  मलाच  ठाऊक आहे
असे  तर  हसतानाही मी रडायला लागलोय
खरंच  काय दोष  असावा  माझा
जे नशीब ही साथ माझी सोडायला लागलंय

वाटतं आता  संपवून द्यावं हे सारं
कसली हे  नातं अन कोण नाही आपलं
आपले  सांगून काळ्जास घायाळ करायला लागलंय ..

अंधारा सोबत  आता  मी जगायला लागलोय
पाठीवर नाही हात कुणाचा तरी ही
थोडं स्वप्न   पाहायला लागलोय
खरे  तर जगताना ही  मरायला लागलोय ...

खरंच आहे मी  हसायला लागलोय ...
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे