Author Topic: "मी"ला ओळखलंच नाही...!(चारुदत्त अघोर....६/४/११)  (Read 1191 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ओम साई.
"मी"ला ओळखलंच नाही...!(चारुदत्त अघोर....६/४/११)
या दुनियेत, विसरलोच कि माझ्यात मी पण आहे,
वाळूच्या ढिगार्यात,कुठे निसटला मी चा कण आहे;
तो कोण आहे हे, अझून कळायचं आहे,
कोणत्या जागी राहतो, तिथं वळायचं आहे;
सुस्त असलेल्या त्याला,जरा छेडायाचं आहे,
किती त्याचं ऋण आहे, ते फेडायचं आहे;
कायम सावलीतल्याला,आता उन्हात न्यायचं आहे,
उन चटकावून सावलीच्याच,सावलीत घ्यायचं आहे;
कायम स्वप्नात असल्या त्याला,जागवायचं आहे,
नेहेमीच शांती हवी असलेल्याला आग्वायचं आहे;
नाविण्य माहित नसलेल्याला,थोडं चमत्कारयाचं आहे,
प्रथमच भेटणाऱ्या मी ला, आज नमस्कारायाचं आहे;
असंख्य विचारांनी ओझलेल्याला,खरं भावनायचं आहे,
कायम पळणाऱ्या मी ला, आज सामनायाचं आहे;
हो कि नाही संभ्रमी असलेल्याला, शर्तवायचं आहे,
चंचल मी ला आज, जीवन अर्थवायचं आहे;
सात कलांच्या इंद्रधनुषी,त्याला रंगवायचं आहे,
मृगजळी तांद्रीत्ल्याला, थोडं भंगवायचं आहे;
ज्या वलयातून आला, तिथं शून्यवायचं आहे,
पाप,पुण्ण्याच्या आरोपात,जरा अन्यायचं आहे;
कारण....
कारण....इतका दुनियेत रमलो कि स्वतःला कधी परखलंच नाही,
असंख्य नाती जोडली पण,मनातल्या "मी" ला मात्र ओळखलंच नाही.
चारुदत्त अघोर (६/४/११)