Author Topic: काही केल्या मनातून जी 'जात' नाही ती 'जात'..  (Read 814 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
काही केल्या मनातून जी 'जात' नाही ती 'जात'..
==============================
काही केल्या मनातून जी 'जात' नाही ती 'जात'..
कधीच कुणी करू शकत नाही हिच्यावर मात
हिच्यामुळेच भिंती उभ्या माणसा माणसांत
हिच्याशिवाय पान हलत नाही कुठल्याही समाजात

कळत नाही कां जन्मली माणसानं हि जात
शेकडो वर्षापासून करते ती माणसांचा रक्तपात
कोण खालचा कोण वरचा असे ठरवले कुणी
जो तो निपुण होता आपापल्या कामांत

फक्त श्रेष्ठत्वासाठी केली माणसानं हि कुरघोडी
बुद्धिवान माणसाने माणसालाच तुडवले पायाखाली
ज्याने त्याने घेतला फायद्यासाठी या जातीचा आधार
स्वतः मोठे झाले पैशाने केले तिलाच निराधार

फक्त हिच्या नावाने मताचा जोगवा मागला जातो
जो तो सत्ताधारी आपल्या पिढ्यांचं भलं करतो
पाहिजे तसे येथे जातीला वाकवले जाते
स्वतःच  भलं करण्यासाठी तिला वापरले जाते

कितीही बोंबलले कुणी माना एकचं माणूस जात
पण ते शक्यच नाही आता या वेड्या समाजात
कोण पुसू शकेल हा शिक्का शाळेच्या कागदावरचा
कधीच पुसला जाणार नाही हा डाग मनावरचा

हि जातच आता ओळख झालीयं प्रत्येक माणसाची
जणू गरजचं झाली आहे ती प्रत्येकाच्या जीवनाची
फक्त धर्माची ओळख पुरेशी जातीला आता नष्ट करावं
तो युगपुरुष येईल जन्माला याची आता वाट बघावं .
======================================
संजय एम निकुंभ , वसई , दि. २७ . १० . १३  वेळ : ७ . ०० स.