Author Topic: आताच "शब्द" माझे  (Read 638 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

 • Jr. Member
 • **
 • Posts: 229
 • Gender: Male
 • कवी प्रकाश साळवी
आताच "शब्द" माझे
« on: April 28, 2014, 01:49:51 PM »
आताच "शब्द" माझे काहीतरी सांगून गेले
आताच "शब्द" माझे अंतरंगी गूढ उकळून गेले

शब्द एक मोठे धारदार शास्त्र आहे
वापरले जपून ज्यांनी, कोडे त्यांचे उलगडून गेले

शब्दात "अर्थ" सारे ठासून भारलेले
ज्याने जसे वापरले त्यांचे "मंत्र" होऊन गेले

शब्द एक शब्दाचा शब्दच भारी वाटे
वापरले वजन "शब्दाचे" काम त्यांचे होऊन गेले

शब्दास शब्द गेला वाढीव भांडणाचा
शब्दास ज्यांच्या जपले त्यांनी ते "महात्मे" होऊन गेले

श्री.प्रकाश साळवी दि. २८ एप्रिल २०१४.   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: आताच "शब्द" माझे
« Reply #1 on: April 28, 2014, 02:19:21 PM »
पहिला टाकून शब्द तुमच्या कडे,
नाही मिळाला शब्द शब्दाला अजून !
पुन्हा एकदा एक फिरून विनंती
द्यावे मार्गदर्शन प्रश्न माझा जाणून !

(संदर्भ: मराठी कवितेत चित्र कविता कशी पोस्ट करावी)

chitra kavita

 • Guest
Re: आताच "शब्द" माझे
« Reply #2 on: April 28, 2014, 03:05:04 PM »
श्री शिवाजी सांगळे मराठी कविता या सदरात तुम्हाला चित्रा सहित कविता पोस्त करावयाची असेल तर खालील गोष्टी कराव्यात
१.)   कवितेला साजेसे चित्र निवडावे.
२.)  नंतर tinypic.com हि URL ओपन करून त्यात चित्र अप लोड करावे. 
३.)  जी URL तयार होईल ती सेव करून ठेवावी
४.)  नंतर "मराठी कविता" ओपन करून त्यात हि url copy paste करावी
५.) नंतर pre-view बघून पोस्टा  करावी.
६.) त्या खाली तुमची कविता post करावी.

हे करून पाहेवे.

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: आताच "शब्द" माझे
« Reply #3 on: April 28, 2014, 04:50:48 PM »
प्रकाशजी, धन्यवाद, मी पण बदलापुरला कात्रप येथे रहातो, आपण बदलापुरात कुठे रहाता? माझा मो.क्र. ९४२२७७९९४१ / ९५४५९७६५८९ आहे.