Author Topic: "स्री" मुळेच घराला घरपण येत असतं  (Read 809 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
"स्री" मुळेच घराला घरपण येत असतं
========================
"स्री" मुळेच घराला
घरपण येत असतं
ती नसतांना घर
एक स्मशान असतं

ती घरांत असल्यावर
दारे खिडक्यांची किलबिल असते
ती घरांत नसतांना
भिंतींचे गाणेही बंद असते

घराचा कोपरा न कोपरा
तिची वाट पहात असतो
चाहूल लागताच पावलांची
आनंदान उसळत असतो

तिचं अन घराचं
घट्ट नातं असतं
ती घरी नसतांनाही
लक्ष सारं घरांत असतं

स्रीच असते लक्ष्मी
प्रत्येक घरा घराची
म्हणून ते घरही
जिवंत वाटत असतं

ती घरांत असल्यामुळेच
चैतन्य घरांत बागडत असतं
तिच्या दोन दिवसांच्या दुराव्यानेही
घर उदास वाटत असतं   
==========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २५.७.१४  वेळ : ९. १५ रा .