Author Topic: ‎.....चा'हूल'.....-  (Read 956 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
‎.....चा'हूल'.....-
« on: July 21, 2012, 04:34:51 PM »

‎.....चा'हूल'.....-

पाहुन अक्षरे अनोळखी...शब्द हि लाजले.....
पाऊल माझ्या अंगणी जाणे कुणाचे वाजले....
.
.
आता अक्षरे हि बोलती,सांगायचे काही तरी
शब्द हि सांगती,मागायचे काहीतरी.........
.
.
मी नभातून शब्द हि मागुन ऐसे आणले......
पावसात पहिल्या जसे मोर नाचू लागले.......
.
.
मोरपीस ओळखीचे मी तुझे कुरवाळतो ......
तुझे अनोळखी शब्द मी,गीतात माझ्या माळतो....
.
.
आता नाही पाऊले,मागणे अन मोरपीसही.....
अता फक्त मीच मजला एकटे सांभाळतो......
.
अता फक्त शब्द माझा मज एकटा सांभाळतो......

------------- प्रशांत जामदार
""एका प्रशांत समयी..!""

Marathi Kavita : मराठी कविता