Author Topic: "पण….!!"  (Read 765 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
"पण….!!"
« on: January 04, 2011, 08:36:51 PM »
II ओम साई II
"पण….!!"
कशाला उसना आव आणून,साजरे करायचे सण?
उगाच लोकांना खुश करायला,आपण सहन करायचे घावाचे घण,
नवं वर्ष येतं म्हणून,सगळी दिखाऊ ताकत,जसं जिंकायचंय  रण;
मला उस्फुर्तच राहायचं आहे,नाही करायचा  नवं वर्षी कोणताच पण.

लोकांनी चांगलं म्हणावं,म्हणून खोट्या मुखवट्याची आवरण,
नुसती खोकल्या नकली हास्याची डोक्यात बसणारी ऐरण,
खर्या भावनांना दाबून ठेवायचं,करून बंद झाकण;
मला उस्फुर्तच राहायचं आहे,नाही करायचा  नवं वर्षी कोणताच पण.

किती हि शो-बाजी,नाही जमली तरी घ्या तिचं दडपण,
नुसती जीवाची घालमेल व आनंदात खोटेपण,
जिथे बसावं,तिथे सामाजिक चेहऱ्यांची नुसती अडचण;
मला उस्फुर्तच राहायचं आहे,नाही करायचा नवं वर्षी कोणताच पण..

का धरायचं उगाच हे कृत्रिम वागण्याचं धोरण,
खोटं स्मित,जसे तासाभरातच  सुकणारं तोरण,
खर्या पणाला दाबून ठेवायचे,जणू पाटबांधाराचे धरण,
मला उस्फुर्तच राहायचं आहे,नाही करायचा नवं वर्षी कोणताच पण..

किती शिगेचा चापाळूसपणा,जणू उतू जाणारे आधण,
स्वतःच्या स्वच्छ पणाला चढवा,नकलीपणाचे कोंदण,
खरेपणा कधीच लपत नाही,जसे लहानपणीचे अंगावरले गोंदण,
मला उस्फुर्तच राहायचं आहे,नाही करायचा नवं वर्षी कोणताच पण.

स्वच्छ भावनांना खळखळू द्या,त्यातच सामावले शुद्ध देवपण,
खरेपणालाच गती खरी,त्यालाच अमरत्व, नाही मरण,;
एवढेच ठरवून जगलं,तरी आपल्यात तो,व त्याचात आपण,
म्हणूनच, मला उस्फुर्तच राहायचं आहे,नाही करायचा नवं वर्षी कोणताच पण..
चारुदत्त अघोर.(दि,४/१/११.)


Marathi Kavita : मराठी कविता