Author Topic: "दिवाळी आली...!"  (Read 826 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"दिवाळी आली...!"
« on: October 26, 2011, 06:59:21 AM »
;D"दिवाळी आली...!";D

घेऊन सुखांची मांदियाळी,
आली आली दिवाळी आली...!
रोजची शुक्रचांदणी ती,
आज नवी झळाळ प्याली...
धुक्याअस्तराची पहाटही
अभ्यंगस्नाने न्हाऊ गेली...
स्वागतार्ही रोषणाई झाली,
दिव्यासंगे शोभा वृद्धांगे रांगोळी...
लावून टिळा चिराटाचा कपाळी,
सानंथोरं सारी हर्षिली मंडळी...
नेसून वस्त्रे शुभ्र साजरी,
आतीशबाजीसवे ओवाळणी दिली...
षोडशोपचारे करुनी पूजा,
घरांघरांत नांदली दिवाळी...
गोडधोड फराळाची सा-यांचीच होई घाईली,
ताटांताटांतून कुजबुजू लागे,
चकली, करंजी अन् शंकरपाळी...
खमंग बेत जेवणाचा,
सोबत नातबंधांची गप्पाळी...
विचारपूस आप्तांची आपुलकीने सुरु जाहली,
इच्छा आणि सदिच्छांची पुढेमागे रीघ लागली...
मंगलदिनी या दिव्यासाक्षीने,
घेऊया चला एक प्रणाली,
शांतसुखे, सुरक्षित करूया,
साजरी यंदाची दिवाळी...! :D 
                               ........महेंद्र :D

Marathi Kavita : मराठी कविता