Author Topic: "नाती दुरावणं एक जिवंत मरण"..!चारुदत्त अघोर  (Read 1924 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं
नाती दुरावणं एक जिवंत मरण..!चारुदत्त अघोर

नाती असणं हे एक, अनमोल देणं आहे,
ती सौंदर्य लेण्या सारखी राहावी,म्हणून जपणं आहे,
एक अदृष्य धागा,ज्याला प्रेमाचं आवरण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.

कोणत्या रस्ती हि नाती,आत भिडतात,
म्हणून आपल्याच माणसांवर लोक चिडतात;
आंतरिक वेदना ह्याच्या जसे,हृदय पोखरण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.

किती माणूस आतुरतेने, ह्यात ओढवतो,
या साठी काहीही करण्यास, सतत पुढावतो;
घालवलेल्या क्षणांची हि,आजन्म साठवण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.   

जो ह्यालाच आधी,अति कष्टाने जोडतो;
एक छोटा गैरसमज,क्षणात ह्याला तोडतो,
मग कितीही निरोप पाठवा,ते निव्वळ चरवी-चरण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.

जेव्हा नातं असतं,त्या विण जसं जगूच नाही शकत,
एक एक सुखाचा घास,नात्याविना गळीच नाही धकत;
खोल असलं नातं, पाचोळा रुपी हलकं तरण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.

किती ओढ असते ह्यात,काही दाखवण्या साठी,
कळत नाही तेव्हा,असतात ह्या रेशीम-बंद गाठी;
कशा या सुटतात ह्याचं, काय स्पष्टीकरण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.

ज्याला जीव लावावा,कि म्हणून तो आपला असतो,
भंगावतं मन जेव्हा जाणवतं, तो कोणाचाच नसतो;
ते नातं नितळ नसून,फक्त गढूळ माती करण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.

कसा समजावणार त्याला,कि तो आपल्याला काय असतो,
म्हणून तर लोक परवा न करता,त्याच्याच जाळी फसतो;
जो जाळी राहणारा किडा नसुन, एक जाळं विणणारी कातण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे, एक जिवंत मरण आहे.

हे मैत्री नातं रक्तापेक्षा,अति तरळ असतं,
वाटलं सहज तरी,इतकं सरळ नसतं;
प्रत्येक श्वास उरती,काटा रूप टोचण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे, एक जिवंत मरण आहे.
चारुदत्त अघोर(१८/४/११)


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,158
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
नाती असणं हे एक, अनमोल देणं आहे,
ती सौंदर्य लेण्या सारखी राहावी,म्हणून जपणं आहे,
एक अदृष्य धागा,ज्याला प्रेमाचं आवरण आहे;
खरंच,नाती दुरावणं हे,एक जिवंत मरण आहे.
khupach chan.....

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा गुणिले पाच किती ? (answer in English number):