Author Topic: "तो पहिला पाऊस"…चारुदत्त अघोर.(७/६/११)  (Read 1487 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"तो पहिला पाऊस"…चारुदत्त अघोर.(७/६/११)
व्याकूळ कासावीस जीव,बेचैन होतो,
ग्रीष्माचे  गरम वारे,अंगी पांघरून घेतो;
निव्वळ तगमगलेला जीव,पाणी पाणी होतो,
कोरडलेला मी,आभाळाच्या बरसण्याला,ऋणी होतो;
किंचित दया करून एक ढग,थोडा सावलावतो,
भरकटलेल्या मनी,शांतता पावलावतो;
त्या एक क्षणीच काल्पनिक ओलावा,मनास भिजवतो,
काव्य धारा ओठी रचवून,थोडं हसवून रिझवतो;
जणू,पहिली सर पावसाची,मुसळून धारवतो,
दूरवर माती कोरडल्या अंगणी,हिरवळ पारवतो;
कुठवर तो ओल्या मातीचा वास,श्वास सुगंधतो,
पुन्हा लहान झालेल्या मनास,नाचण्यास बेधुंदतो ;
माझा खिडकीच्या पडवी,साचल्या पाण्यास,टपकावतो,
माझे हाथ बाहेर काढून,ते नितळ थेंब धरण्यास लपकावतो;
त्या खिडकीच्या आडी माझ्या,टेबलावर धुवाधार तुषार फवारतो,
ओल्या झाल्या टेबली,साचल्या थेंबांना बोटी आखून नवारतो;
नकळतच प्रफुल्लीत मनानी मी एक रसाळ कादंबरी वाचण्याचं बेततो,
एक एक ओळ बेभान कर्त्या मनास,उस्फुर्तपणे गुलाबून चेततो;
तो गोड गुन्हा घडावा करिता,सर्व पाप ,गुन्हा माफी, हरपतो,
फक्त उत्तुंग रसना बरसाव्या,म्हणून खमंग कॉफी हुरपतो;
सहज वाः म्हणून दाद देता,दिसतं ती असते दिसल्या स्वप्नी न फिटली हौस,
पुन्हा आतुरतेने खिडकीत वाट बघतो मी, कि केव्हा येईल "तो पहिला पाऊस"
चारुदत्त अघोर.(७/६/११)


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक पाच किती ? (answer in English number):