Author Topic: "सावली..."© चारुदत्त अघोर.(१८/८/११)  (Read 906 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"सावली..."© चारुदत्त अघोर.(१८/८/११)
कोणाला हि जीव न लावणे,हे आधी कधीच नाही पटलं,
आयुष्य जसं लोकांवरच,स्वखुशिनी लुटलं;
निष्कारण मोहात पडून,आंधळी माया लावली;
आयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...

निव्वळ जनरीत म्हणून,उगाच जीव गोवायचा,
एक एक क्षण त्या, व्यर्थ वेळात ओवायचा;
न बाप,बंधू,भगिनी,न माय माझी माउली;
आयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...

हा माझा तो माझा,म्हणून किती स्वतःला फसवायचे,
घट्ट विणलेल्या माया चादरीचे,जीर्ण धागे उस्वायचे;
या फसव्या माया चादरीने,का कधी थंडी उबावली;
आयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...

न प्रपंच माझा,न बायको न मुले आहेत माझी,
स्वार्था साठी होतात,सगळे वेळे पुरते राजी;
थोडाही अपेक्षा भंग झाला तर,होते जीवाची तडपावली;
आयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...

का मग या जगाशी,स्वतःला मिसळून एकवू,
कोणता आपला खांदा आहे,ज्यावर मान टेकवू;
कोणीच असा नाही,ज्यावर माया हक्कावली;
आयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...

स्वार्थाची दुनिया हि,फक्त स्वार्थी हि जन-नाती,
लुटून नेणार तुम्हास कायम,न ठेवता काही हाती,
फक्त ईश्वरच तो माझा,ज्याकडे मार्गावी वाट पावली;
आयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...
चारुदत्त अघोर.(१८/८/११)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Khup aavadali kavita tumachi.......... aani ya aadhichya hi sagalya chhanach hotya.

ya kavitebaddal sangu ka .......andharat tar savalyahi pasar hotat.........tya pan saath tevhach detat jevha prakash angavar padato........ sharirat "ॐ साईं." asestovar savali hi aahe nahitar tichahi kay upyog...barobar na!!!