Author Topic: "शुभ दीपावली..."© (चारुदत्त अघोर)  (Read 957 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!

ॐ साईं.
"शुभ दीपावली..."© (चारुदत्त अघोर)
बहरू द्या द्वार-अंगण,
रम्य ठेवा पारस;
गो माता हंबरू द्या,
तेच खरं वसू-बारस;
 
रंगवू द्या रांगोळी,
द्वार-अंगणी सरस,
सुवर्ण खरेदी होऊ द्या,
साजरं व्हावा धनतेरस;
 
विनाशो आसुर बुद्धी,
ठेवा मन पारदर्शी;
अभ्यंग स्नान करून,
व्हावी नर्क-चतुर्दशी;
 
दीप माला ज्योतवा,
करा मंगल सनई गुंजन;
धन संपत्तीची बरसात होवो,
स्वगातून करा लक्षिमि-पूजन;
 
मनसोक्त करा फराळ,
न स्वतःस आडवा;
गृह-लक्षिमिस प्रसन्न करा,
मान धनाऊन पाडवा;
 
घर प्रकाशो, उडवून आतीशी,
तरच या सणाचे काही चीज;
आज चा दिवस भाऊ रायांचा,
औक्षवणून त्याला,तीच भाऊबीज;
 
साजरी करा,आगळ्या मोसमी,
काही ग्रीश्मित,काही हिवाळी,
लख लखून जाऊ द्या हर क्षण,
मंगलमयी होवो दिवाळी;
 
काही त्रुटी न राहो,कि व्हावं अरेच्चा;
तुम्हा स्रावांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....!
चारुदत्त अघोर(२३/१०/११) 
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....!