Author Topic: "मनातला पाऊस" स्वरचित कविता  (Read 2426 times)

Offline sameer.kadam.718

 • Newbie
 • *
 • Posts: 1
मनातला पाऊस

अंगी लाही लाही होता,मला पाऊसाची आस,
येता आभाळ दाटुन, होई धरणीही कासावीस.

दाट आभाळ पाहुन,होई माझे मन अधीर,
येता पाऊस पहिला, होई आसमंत मधुर.

धुंद पाऊस येता,येई मनाला उधाण,
शिड भरता मनाचे, येई शब्दांनाही स्फुरण.

थेंबाथेंबातुन येता झंकार, डोलु लागे माझे मन,
डोलु लागे वनराई, मन गेले गुंजनात हरखून.

गेला शिणवा थकवा, गाऊ लागले सारे हे रान,
ध्यानीमनी वसे, निसर्गाचे हे गान.

धुंद पाऊसाने माझे, मन झाले रे घायाळ,
येता उफाळून मन, होई कविता शब्दबंबाळ.

-समीर कदम (८ जुन २०१३)Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
chan

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
mastach....sameer

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
 छान कविता !! :) :) :)