Author Topic: " बाधा "  (Read 634 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
" बाधा "
« on: February 24, 2014, 08:50:01 AM »
" बाधा "
-शाम | 13 December, 2013 - 14:03

नील नभाची लंघुन माया तेज चालले पुढे पुढे
गडद जांभळी शाल पांघरुन पर्वतराजी शांत पडे

निरव निळाईवरी भाळला दूर दिवाना घन वितळे
जळात विरघळलेले केसर बिंब मिरविते टंच तळे

सावळ वृक्षी एकट पक्षी राग मारवा आळवतो
वारा हळव्या तृणपात्यांतुन हिरवी सळसळ कालवतो

एक एक क्षण बुडतो येथे तसा तिथे उगवे तारा
रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा

परतीच्या वाटेत मनाचे पुन्हा पुन्हा पाउल अडते
जीव गुंतला सोडवताना गाठ नवीन जणू पडते

या खेळाची स्थळ-काळाची जडली बाधा चित्त झुरे
संग सावळा घडता जैसा राधाहृदयी शाम उरे
_________________________________शाम


(http://www.maayboli.com/node/46785 )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: " बाधा "
« Reply #1 on: February 24, 2014, 10:16:20 AM »
छान कविता शशांक. ''शाम'' हे उपनाम घेतलं आहेस का?

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: " बाधा "
« Reply #2 on: February 24, 2014, 04:55:51 PM »
अरे बाबा, हा "श्याम" नामक कोणी वेगळाच आहे (मी बिल्कुल नाहीये) - मायबोली डॉट कॉम वर लिहित असतो. कविता, गजला व ललित लेख या सगळ्या प्रकारात त्याची मास्टरी आहे आणि लिखाण स्टाईल तर एकदम भारीए...  :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: " बाधा "
« Reply #3 on: February 27, 2014, 07:55:45 PM »
good