Author Topic: "शाळा "  (Read 1088 times)

Offline Dr.Sameer Sakpal

  • Newbie
  • *
  • Posts: 3
"शाळा "
« on: March 11, 2012, 10:44:59 PM »
"शाळा "

रात्रीची वेळ होती
शरीर पूर्ण थकलेला होता,
पण  का कोणास ठाऊक ?
डोळ्यास डोळा लागत नवता..

अचानक एक गार वारा आला
क्षणांतच मनाला हळूच घेऊन गेला
पाहतांच क्षणी स्वप्न चालू झाल
शालेच्या आठवणीत, एक विश्व सुरू ज़ाल

शाळेची घंटा, तास काही निराळेच असायचे
'हजर' म्हणून मोठ्याने ओरडत नाव नोंदवायचे
गृहपाठची बोंब तर नेहमीचीच असायची
इतरांची वही छापण्यात 'झक्कास' मजा यायची

'पी.टी.' चा तास म्हटला तर फुल-टू धम्माल
कबड्डी क्रिकेटचे सामने खेळत दाखवायचो कमाल
आडव्या- उभ्या रेषा मारत चित्रे रेखाटवयाची
एकमेकांना दाखवत , त्याची फुल तर उडवायची

'द्प्फ्तर' म्हणजे सतराशे- साठ वह्या पुस्तकांचा ओझा
'स्वाध्याय पूर करणं' हा आमच्यासाठी नेहमीचाच बोझा
एकमेकांच्या खोड्या काढल्याविना चैन कोणाला लागे
'कानाखाली दोन' पडताच हुशार्पण येई मागे

बसण्यापासून उठण्यापर्यंत सगळीकडेच होती मारामार
'टवाळ पोर' म्हणवून घेत मागील बाकड नेहमीच तयार
इतरांना काही वाटो आम्ही नेहमीच बिनधास्त
परीक्षेच्या स्पर्धेत मात्र सगळ्यांना करायचो खल्लास

स्पर्धा, बक्षीस यांत नेहमीच लागायची चढावोढ
पहिला नंबर काढण्यात मात्र सगळ्यानांच ओढ
पैकी पैकी करण्यातच परीक्षा संपायची
सुट्टीच नाव ऐकताच बोंब ठोकत जायची

  'माझा आयटम, ह्याची छावी' करण्यात सगलेच दंग असायचे
एकालाही खरे-खुरे प्रेमाचे गंध नसायचे
एकमेकाना चिडवत टाइमपास करत बसायच
'शाळेत जाण्याच्या नावाच' निमित्त करून टाकायच

दबक्यातील बेडकाप्रमाने उड्या मारत फिरायचो
घर,शाळा, परीक्षा यालाच विश्व समजायाचो
कधी तर वाटे गरुदासाराखी उंच जेप घ्यावी
 छोटे छोटे म्हणउन  घेत मनावर दडपण येई

'पास -नापास ' म्हणत दिवस पुढे ढकलत होते
पुढील जबाबदर्याना जणू आव्वानाच देत होते
अक्कल नाही का? ...कोणी म्हटल की डोकच सटकायच
आताल्याताच मन 'मोठा जालास' ची जाणीव करून दयायच

असू आम्ही मोठे पण कस विसरु आमच बालपण
'शाळा' या शब्दातच दडलेय ' खोल आठवनिची साठवण '.............

                  - Dr.Sameer Sakpal
« Last Edit: March 11, 2012, 11:09:05 PM by Dr.Sameer Sakpal »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: "शाळा "
« Reply #1 on: March 12, 2012, 11:39:05 AM »
mast..