Author Topic: आपल्यापुरते जगणे - एक (निंदनीय) वृत्ती  (Read 661 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
जो तो आहे बरोबर आपापल्या परीने,
म्हणणे पटते स्वताचे अगदी खरोखरिने.

मी सावलीत आहे का करू पर्वा  कुणाची,
मी हि झेलली आहेचना झळ या उन्हाची.
दोन क्षण सुखाचे मी भोगत असतांना,
का म्हणता मी वागतो अगदी मग्रुरीने.

माझे खरचटणे आहे जरा  भयंकर,
मी का घालावी कुण्या जखमेवर फुंकर.
तू भोग शिक्षा तुझ्या नशिबाची
काय फरक पडतो मी तुला वागवले  मस्करीने

मला चालण्याचा रस्ता हवाच समृद्ध,
तू शोध तुझा मार्ग स्वताचा खुदद .
मला नाही जोडायचे नाते उगीच नुकसानीचे,
का मी घासभर उपाशी राहू वागून  माणुसकीने.

माझ्या घराची इज्जत पदरात झाकलेली,
इतरांची जणू ती वेशीवर टांगलेली.
मनात जरी मी पिसाटापरी वागतो,
जगतो तरी मी नटून सभ्यतेच्या जरीने.

जरी भरले पोट तरी ठेवतो साठवून,
नासले जरी ते नाही देत इतरांस वाटून.
आज जरी अपूर्ण कुण्या  गरजवंताची गरज,
उद्याची तयारी मी करितो जीकरने.

माझ्यापुरता जगण्याचा हा भीतीयुक्त छंद,
जरी कळते चूक तरी करून डोळे बंद.
अपराधीपणाची  भावना घालता मनी थैमान,
मी खोटे पटवून देतो खऱ्याच्या बरोबरीने.

..........अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
अमोल
खूप छान कविता आहे. खास करून शेवटचं कडवं प्रत्येकाच्या बाबतीतलं एक विदारक पण अपरिहार्य सत्य दाखवतं. काही इलाज नाही.