Author Topic: “प्रगल्भित वेडे”…. चारुदत्त अघोर.(२/५/११)  (Read 916 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
“प्रगल्भित वेडे”…. चारुदत्त अघोर.(२/५/११)
जेम तेम फक्त आठ दिवस गेलेत,न काही लिहिता,
उभे वारे लागले कारण,स्फुरली नाही एक कविता;
जसा प्रत्येक क्षण वाटला अनाथ,
कारण हूर हूर फक्त होती मनात;
आता कळलं,कि मी कागद आणि पेन शिवाय राहूच नाही शकत,
पेनातली शाई सुकली तरी, मनातली मात्र नाही सुकत;
किती म्हणून विषय हाताळायचे,
शब्दां वर शब्द,भावना उकळी वर उकळायचे;
पण तेही केल्या शिवाय काय बर वाटतंय,
नाही लिहिलं तर,पिळवटून हृदय दाटतंय;
किती सुंदर आहे हे,माझं काव्य जग,
नाही कसलीच घाई, ना कसली तग मग;
सगळे स्नेही येवून, परत जातात,
फक्त प्रसंग काय ते, स्मरणी राहतात;
त्या प्रसंगांचीच असते,उरली सदैव साथ,
जे कायम आठवणी रूप,घट्ट मुठतात हाथ;
धुंदावत मला संगीत वा शब्द रागात;
आणि चालवतात पुढलं पाउल,अज्ञान जगात,
पण ते जगही आधीच रेखाटतात,लिहून पंक्ती,
मग कोणी राहो न राहो, बरोबर संगती;
या शब्द सुमानांन्चीच,खरी असते मैत्री,
कोणताही मास असो,जेश्ठी,आषाढी वा चैत्री;
कोणत्याही कवीला एक एक शब्द म्हणजे त्याचा प्रत्येक श्वास,
जसा अंतिम क्षणी,दैवाभास होण्याचा ध्यास;
यांची दुनियाच मुळी कागद,कलम शाई,
आणि रचले काव्य म्हणजे,प्रेयसी,बहिण,आई;
काव्य हेच ब्रम्हांड,असो परदेश,शहर वा गाव-खेडे,
खरंच,जगदृष्टीतून असो वा स्वदृष्टीतून, हे असतात प्रगल्भित वेडे. 
चारुदत्त अघोर.(२/५/११)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Khuuuuuuuuuuuuuupach chhan !! mast mast mast