Author Topic: (महिला दिनाच्या पूर्व संध्येला )  (Read 554 times)

Offline Shashi Dambhare

 • Newbie
 • *
 • Posts: 10
(महिला दिनाच्या पूर्व संध्येला )

आम्ही , फेसबुक समोर बसून,
स्त्री प्रश्नावर चर्चा करून , थकलेल्या
दमलेल्या बायका .....
उद्याच्या ,महिला दिनाच्या तयारीला लागलेल्या बायका .........
आम्ही जबाबदार, ख़बरदार,ऐपतदार बायका
हुशार,कर्तबगार ,समजुतदार बायका ...
लढ़णा-या , झगडणा-या,
कायद्याने, घटनेने
समानता मागणा-या बायका .....

महिला दिनाच्या दिवशी
माझ्या मनात सळसळत असतात
या सा -या "आम्ही " बायका
स्त्रीला सबला आणि
समर्थ करणा-या ....या .... "आम्ही" बायका ..........

पण याच बरोबर, याच दिवशी
मला टोचतात,खेचतात ,ओढतात " त्या " बायका
ज्यांना हा दिवस माहितीच नाही
अशा माझ्या माहितीतल्या कितीतरी " त्या " बायका .....

पहाटे दूध , भाज्या विकायला ,
झाड़ू -खराटे घेवुन रस्ते झाडायला निघालेल्या बायका,
रात्र कशीही गेली तरी, सकाळीच
कामावर निघालेल्या बायका ...

फुलांचे गजरे, फळांचे हारे ,
कच-याचे भारे...उचलणा-या बायका
खडबडीत रस्त्यांवर डाम्बर ,
आणि फाटलेल्या वस्त्यांवर पदर
पसरवणा-या बायका .....

या दिवसाची शुद्ध नसलेल्या
बेशुद्ध बायका ...
अर्वाच्य, अश्लील,
अंदाधुंद बायका ....

पोरांची फी वाढली म्हणून
जास्तीची 'घरे' धरणा-या बायका
बदनाम गल्लीत अनैतिक असले तरी
आपले ' आईपण" जपणा-या बायका .....

दमलेलं, शिणलेलं जगणं विसरण्यासाठी
' पव्वा ' मारून निजणा-या बायका
सोसणा-या, पोसणा-या,
देह संपेपर्यन्त ..... झीजणा-या बायका .....

हो, महिला दिनाच्या दिवशी जेंव्हा दिसतात
झेंडे घेवून घोषणा देत चालणा-या "आम्ही"' बायका
तेंव्हा मला आठवतात
स्वत:च एक झेंडा म्हणून, स्वत:त, स्वत:ला
रोवून उभ्या असलेल्या सगळ्या ' त्या' ही बायका ....!
शशी .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
हो, महिला दिनाच्या दिवशी जेंव्हा दिसतात
झेंडे घेवून घोषणा देत चालणा-या "आम्ही"' बायका
तेंव्हा मला आठवतात
स्वत:च एक झेंडा म्हणून, स्वत:त, स्वत:ला
रोवून उभ्या असलेल्या सगळ्या ' त्या' ही बायका ....!
शशी .
 
 
khupach chan mitra....

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
uttam kavita.........